📅 ७ रात्र ८ दिवस
👥 १० ते ३० व्यक्ती
📅 मे ते ऑक्टोबर
👥 मुंबई/पुणे - लेह - मुंबई/पुणे
दिवस 1: पुणे-श्रीनगर (दिल्ली मार्गे) विमानप्रवास-श्रीनगर आगमन लोकल स्थळदर्शन
पुणे येथून विमानाने श्रीनगर करिता (दिल्ली मार्गे) प्रयाण, श्रीनगर येथे आगमन, श्रीनगर मधील निशाद गार्डन बघून हाऊसबोट चेक
इन. संध्याकाळी फेमस दल लेक शिकारा राईड करून हाऊसबोट मुक्काम
दिवस 2: श्रीनगर-सोनमर्ग -कारगिल
सकाळी नाश्ता करून कारगिलकडे प्रस्थान, वाटेत सोनमर्ग येथील निसर्ग सौंदर्य, द्रास येथील कारगिल वॉर मेमोरियल ला भेट.
कारगिल आगमन हॉटेल चेक इन. रात्री जेवण करून मुक्काम
दिवस 3: कारगिल -लेह
सकाळी नाश्ता करून कारगिल येथील हिमशिखरे पाहत लेह करिता प्रयाण, वाटेत लामायुरू मॉनेस्ट्री, झंस्कार आणि सिंधु नदी या
दोन नद्यांचा संगमला भेट, मॅग्नेटिक हिल ला भेट आणि पठार साहिब गुरुद्वारा पाहून लेहकडे प्रयाण, लेह आगमन हॉटेल चेक इन.
रात्री जेवण करून मुक्काम
दिवस 4: लेह-नुब्रा व्हॅली
सकाळी नाश्ता करून नुब्रा व्हॅली कडे प्रयाण, वाटेल खारदुंगला पास (लडाख मधील खारदुंगला पास हा जगातील सर्वाधिक उंचीवरील गाडीरस्ता आहे. याची उंची आहे 18,380 फूट. नुब्रा व्हॅली कडे जाणारा एकमेव मार्ग आहे. सियाचेन हिमनदी हा नुब्रा व्हॅलीचाच भाग आहे) नुब्रा व्हॅली येथे आगमन, सफेद रंगाचे वाळवंट व दोन मदारीच्या उंटावरून सफारी करून रात्री नुब्रा येथे टेंट मध्ये मुक्काम.
दिवस 5: नुब्रा व्हॅली-लेह
सकाळी नाश्ता करून लेह कडे प्रयाण, वाटेत डिस्किट मोनेस्ट्री आणि लेह पॅलेस पाहून लेह हॉटेल ला आगमन. संध्याकाळी लेह मार्केटमध्ये खरेदीसाठी मोकळा वेळ. रात्री जेवण करून मुक्काम
दिवस 6: लेह -पेंगोंग लेक -लेह
सकाळी नाश्ता करून पँगाँग लेक कडे प्रयाण, वाटेल चांगूला पास (लडाख मधील चांगूला पास हा जगातील सर्वाधिक 3 रा उंचीवरील गाडीरस्ता आहे. याची उंची आहे 17,350 फूट). पँगाँग लेक कडे जाणारा हा एकमेव मार्ग आहे. पँगाँग लेक आगमन-लेक फोटोग्राफी, फेरफटका करून दुपारी जेवणानंतर लेह कडे प्रयाण. रात्री जेवण करून मुक्काम
दिवस 7: लेह लोकल स्थळदर्शन
सकाळी नाश्ता करून लेह लोकल स्थळदर्शन Hall of Fame, Shey Palace, Thiksay Monastry आणि 3 Idiots
मुव्हीमधील Rancho School ला भेट. रात्री जेवण करून मुक्काम
दिवस 8: लेह-पुणे विमानप्रवास (दिल्ली मार्गे)
सकाळी नाश्त्यानंतर हॉटेल चेक आऊट करून लेह विमानतळाकडे प्रयाण, लेह ते पुणे विमानप्रवास, टूर समाप्त.
पुणे ते श्रीनगर विमानप्रवास तिकीट (दिल्ली मार्गे)
लेह ते पुणे विमानप्रवास तिकीट (दिल्ली मार्गे)
उत्तम प्रकारचे 3 स्टार हॉटेल (डबल शेअरिंग)
सकाळी चहा-नाश्ता आणि रात्रीचे जेवण
रोज प्रत्येकी 1 लिटर पाणी बाटली
वरील नमूद केलेल्या सर्व स्थलदर्शनाचे प्रवेश शुल्क
अंतर्गत प्रवासासाठी नॉन ए.सी. Tempo ट्रॅव्हलर
ग्रुप टूर सोबत मराठी मार्गदर्शक आणि मार्गदर्शकांचे मानधन
भारत सरकार टॅक्स 5%
घरापासून एअरपोर्ट पर्यंतचा खर्च
सोनमर्ग येथील घोडा खर्च
नुब्रा व्हॅली येथील (उंट सफारी) आणि बर्फातील खेळ
हॉटेलमधील टिप, लॉड्री, फोनबिल, व्यक्तिगत खानपान
पॅकेज व्यतिरीक्त गेस्ट कडून केला गेलेला खर्च
वरील सहलीं विषयी काही अधीक माहिती हवी असल्यास आमच्याशी प्रत्यक्ष संपर्क करावा. खाली ‘संपर्क करा’ या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही माझ्याशी व्हॉट्सॲप वर चर्चा करू शकता. याशिवाय आम्ही कस्टमाईज्ड सहली आयोजित करीत असतो. अधिक माहितीकरीता खाली दिलेल्या बटनाद्वारे संपर्क करावा.