📅 ११ रात्र १२ दिवस
👥 २० ते ५० व्यक्ती
📅 मे ते ऑक्टोबर
👥 हरिद्वार - चारधाम - हरिद्वार
दिवस पहिला - हरिद्वार येथे आगमन व अतिथी भवन येथे भोजन व विश्रांती घेऊन सायंकाळी गंगा आरती करून रात्री भोजनोत्तर मुक्काम..
दिवस दूसरा - पहाटे पाचाची वाजता आपण बस द्वारे राणाचट्टी ला जाण्यास निघणार आहोत.. हिमालयातील शांत सुंदर ठिकाणी नाष्टा/भोजन घेऊन, सायंकाळी हरिद्वार पासून २४० किमी असणाऱ्या राणाचट्टी या यमुना नदीच्या तीरावर वसलेल्या लहानशा गावात जाऊन भोजनोत्तर मुक्काम..
दिवस तिसरा - सकाळी नाश्ता करून जवळच म्हणजे सात किमी असणाऱ्या जानकी चट्टी या ठिकाणी पोहचून तेथून पाई, घोडा, वा पालखी द्वारे.. आपण यमुना मैया चे उगमस्थान असणाऱ्या यामुनोत्री मंदिरा साठी निघू.. एका एका बाजूने आठ किमी पाई प्रवास करून तप्त कुंडात स्नान दर्शन पूजन करून.. परत जानकीचटी ला येऊन बस द्वारे राणाचट्टी ला येऊन भोजनोत्तर मुक्काम...
दिवस चवथा - आज सकाळी जरा आरामात उठून स्नान भोजन करून आपण १३०किमी असणाऱ्या उत्तरकाशी या उत्तराखंड मधील शहरात येऊन प्रथम इथले आराध्यादैवत भगवान विश्वनाथ यांचे दर्शन पूजन करून उत्तरकाशी येथेच भोजनोत्तर मुक्काम...
दिवस पाचवा - आज पहाटे पाच वाजता गंगा माईच्या उगमस्थान आपण जाण्यास निघणार आहोत.. हा रमणीय प्रवास लहान मोठे घाट मनाला मोहरुन सोडतात.. शंभर किमी प्रवास करून गंगा स्नान, दर्शन पूजन करून आपण पुन्हा उत्तरकाशी येथे येऊन भोजन व विश्रांती..
दिवस सहावा - सकाळी लवकर नाष्टा करून रामपूर साठी निघून वाटेत रुद्रप्रयाग येथील अलकनंदा व मंदाकिनी नदीच्या संगमचे देवदूर्लभ असे दर्शन.. बस मधून घेऊन, पुढे रामपूर येथे पोहचून भोजन व मुक्काम..
दिवस सातवा - आज पहाटे चार वाजता रामपूर ते सोंनप्रयाग - गौरीकुंड हे स्थानिक वाहना द्वारे व तेथून पाई, घोडा, पालखी द्वारे केदारनाथ मंदिर दर्शना साठी प्रस्थान.. आजचा संपूर्ण दिवस दर्शन आणी प्रवास करून रात्री पुन्हा रामपूर येथे येऊन मुक्काम.. *(पाई प्रवास एका बाजूस १९ किमी अंदाजे आहे)
दिवस आठवा - सकाळी आरामात उठून स्नान भोजन करून.. जोशीमठ च्या अलीकडेच पिपलकोटी येथे जाण्यासाठी प्रस्थान पिपलकोटी या गावात सायंकाळी पोहचून भोजन व विश्रांती..
दिवस नववा - पहाटे पाच वाजता आपण भगवान बद्रीनाथ यांच्या दर्शनासाठी बस द्वारे निघून.. अंदाजे चार तासांच्या प्रवासांनंतर बद्रीनाथ येथे.. गरम कुंडात स्नान दर्शन पूजन तसेच तर्पण श्राद्ध आदी करून.. भोजन प्रसाद ग्रहण करून पुन्हा पिपालकोटी येथे येऊन.. विश्रांती..
दिवस दहावा - सकाळी लवकर ऋषिकेश साठी निघून.. दुपारी रामझुला, लक्ष्मण झुला, सर्गाश्रम, आदी ऋषिकेश मधील स्थलदर्शन स्थानिक ऑटो द्वारे करून.. पुढे हरिद्वार येथे येऊन अतिथी भवन मधे भोजन व विश्रांती..
दिवस अकरावा - आजचा संपूर्ण दिवस हरिद्वार येथे वैयक्तिक पुजा पाठ ई.साठी राखीव ठेवण्यात आला असून संयोजक त्या प्रमाणे सूचना देतीलच रात्रीचा मुक्काम
दिवस बारावा - सकाळी कर्नाटक/ मंगला एक्सप्रेस द्वारे मनमाड - नाशिक - मुंबई साठी प्रस्थान..
हरिद्वार ते चारधाम यात्रा व परत हरिद्वार पर्यंत 2×2 लग्झरी वाहन अथवा यात्री संख्या पाहून वाहन ठरविले जाते.
हॉटेल मधील वास्तव्य एका रूम मधे तीन अथवा चार व्यक्ती
रोज दोन वेळा चहा किंवा कॉफी सकाळी एक वेळ नाष्टा आणि दूपार आणि सायंकाळी असे दोन वेळा भोजन व्यवस्था
यात्रा कालावधीत रेल्वे प्रवास वगळता रोज दोनवेळा चहा/कॉफी/दूध, तसेच एकवेळा पोटभर नाष्टा, व एकवेळ शुद्ध शाकाहारी भोजन (रात्री) तसेच निवास व्यवस्था हॉटेल मधील ॲट्याच रूम मध्ये तीन किंवा चार शेअरिंग मधे असेल .. नाही (ऊपलब्धते प्रमाणे) यात्रेकरूंना
स्वतंत्र रूम हवी असल्यास तेथील उपलब्धतेनुसार अतिरिक्त रक्कम देऊन घेता येईल.
अतिरिक्त खर्च अर्थात रेल्वे प्रवासातील चहा, पाणी, नाष्टा, भोजन, मंदिर प्रवेश तिकीट, गार्डन तिकीट, ऑटो रिक्षा, खरेदी, पूजा, बोटिंग, रोप वे, घोडा, पालखी, Helicopter हे यात्रा सेवा शुल्कात समाविष्ट नाहीत.
हरिद्वार, ऋषिकेश , स्थळदर्शन तसेच रामपूर ते गौरीकुंड हे स्थानिक वाहना द्वारे वयक्तिक खर्चात करावे लागेल.(किंवा हे चार किमी अंतर आपण चालत सुद्धा जाऊ शकता)
अविस्मरणीय व सुरेख यात्रेसाठी आपले अमूल्य सहकार्य अपेक्षित आहेच. क्वचीत प्रसंगी दैनिक कार्यक्रमात बदल करण्याचा अधिकार आयोजकांनी राखून ठेवला आहे.
येथिल वातावरण हे निसर्गावर अवलंबून असते ते कधीही बदलू शकते अचानक पाऊस, भूस्खलन,जाम लागणे ह्या अडचणी येत असतात त्यामुळे यात्रेच्या वेळापत्रकावर परिणाम होतो ऊदा. (नियोजित मूक्काम अथवा दर्शन) अशा प्रसंगी यात्रेकरूंची गैरसोय होवू शकते तशी मानसीक तयारी ठेऊनच यात्रेत सहभागी व्हावे कारण अशा वेळी आयोजकही कोणतीही पर्यायी व्यवस्था करु शकत नाही.
यात्रेकरूंनी आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर यात्रेत सहभागी व्हावे, कोणत्याही प्रकारच्या जिवित अथवा वित्तहानीस आयोजक जबाबदार नसतील.
एकदा भरलेली रक्कम कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
सर्व दर्शन व स्थलदर्शन पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असतोच त्याव्यतिरिक्त आणखीही अतिरिक्त स्थळे दाखवण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो.
वरील सहलीं विषयी काही अधीक माहिती हवी असल्यास आमच्याशी प्रत्यक्ष संपर्क करावा. खाली ‘संपर्क करा’ या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही माझ्याशी व्हॉट्सॲप वर चर्चा करू शकता. याशिवाय आम्ही कस्टमाईज्ड सहली आयोजित करीत असतो. अधिक माहितीकरीता खाली दिलेल्या बटनाद्वारे संपर्क करावा.